आणे:- (कराड)-ज्योतिर्लिंग गणेश मंडळ आणे यांचे वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ज्योतिर्लिंग गणेश मंडळ आणे यांचे वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
आणे, ता. कराड:- आणे येथील कै. निवृत्ती मारुती देसाई गुरुजी यांचे स्मरणार्थ माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी, बारावी , सीईटी, शिष्यवृत्ती, राज्य लोकसेवा आयोग या परीक्षात ज्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले . त्यांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुणे प्रा. अधिकराव कणसे सर, प्रा, शिवाजीराव देसाई, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आत्माराम देसाई या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. खरी गुणवत्ता ही संघर्षात असते आणि खेड्यातील मुले संघर्षाला कधीही घाबरत नाहीत त्यांच्याकडे जिद्द, चिकाटी असते फक्त थोडाफार न्यूनगंड असतो तो जर त्यांनी नाहीसा केला तर यशापासून त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. शिक्षणाने माणूस सर्व गुणसंपन्न बनतो हेच लक्षात ठेवा. मोबाईलच्या आहारी जाऊ नका मोबाईल हे काल्पनिक विश्व आहे. या गावच्या मातीतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा. शिक्षणाचा उपयोग केवळ पैसा मिळवण्यासाठी करू नका तर आपल्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी करा. विशिष्ट स्वप्न, ध्येय उराशी बाळगून वाटचाल करा यश तुमचं असेल. आपल्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं तर आपलं जीवन व्यर्थ असतं आणि आपल्यासाठी जर आई-वडिलांच्या डोळ्यातून पाणी आलं तर आपलं जीवन सार्थ असतं असा सल्ला आपल्या मनोगतातून प्रा.अधिकराव कणसे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी गावातील महिला, पालक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक बाळासाहेब देसाई सर यांनी केले, आभार मंडळाचे कार्यकर्ते गणेश देसाई यांनी मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय देसाई, तानाजी देसाई प्रशांत देसाई, सागर देसाई, अभिजीत देसाई, उपस्थित होते.