फलटण:-श्रीमंत रामराजे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त साखरवाडीत वृक्षारोपण.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
श्रीमंत रामराजे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त साखरवाडीत वृक्षारोपण.
साखरवाडी प्रतिनिधी दि . ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साखरवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये विधानपरिषदेचे मा. सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ८ ते ९ फुटी उंच असलेल्या झाडांचे वृक्षारोपण येथील सामाजिक कार्यकर्ते साखरवाडी ग्रामपंचायतचे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष राजे गटाचे कार्यकर्ते दिलीपबाबा पवार यांच्या वतीने साखरवाडी येथील माजी सैनिक संघटनेच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी माजी सैनिक संघटनेचे नामदेव इंगळे शिवाजी पवार शंकर नरुटे नामदेव साळुंखे विष्णू भोजने सतीश वाघमारे दीपक खलाटे अनिल गायकवाड अजित पवार शाहूराजे भोसले विनोद चव्हाण इम्तियाज मुजावर सह हिंदूराव वारे राजेंद्र वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी दिलीप पवार म्हणाले साखरवाडी परिसराचे भाग्यविधाते रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाठीमागे साखरवाडीतील एका सत्कार समारंभा प्रसंगी फलटण तालुक्यात झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते या आव्हानास प्रतिसाद देऊन आपण साखरवाडी पिंपळवाडी परिसरात अनेक झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे रामराजे निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देश सेवा करणाऱ्या या शूरवीरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साखरवाडी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे यापुढेही आपण रामराजे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावातील नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्रांचे वाचनालय सुरू करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.