फलटण:-योग ,प्राणायम ध्यान यामुळे स्त्रिया अधिक सक्षम होतील : डॉ अलका पोळ
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
योग ,प्राणायम ध्यान यामुळे स्त्रिया अधिक सक्षम होतील : डॉ अलका पोळ
स्त्रीला निसर्गाने सहनशीलतेचे वरदान दिले आहे, त्यामुळे ती वेगळ्यवेगळ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. परंतू ती स्वतः कडे दुर्लक्ष करते.तर तीने चांगला आहार घेतला पाहिजे, थोडा वेळ स्वतः साठी काढून योगा, प्राणायाम, ध्यान ही केले पाहिजे. यामुळे ती जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अजून सक्षम होईल. विद्यार्थिनींनी कोणत्या ही प्रलोभनांना बळी न पडता स्वतः च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व आपले ध्येय गाठले पाहिजे. असे मार्गदर्शन डॉ अलका पोळ यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आंतरराष्ट्रीय मानवीमूल्य संस्था अंतर्गत प्रोजेक्ट पवित्र हा महिला आरोग्य, स्वच्छता व स्वास्थ्य याविषयीचा कार्यक्रमात सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे त्यांनी केले
या वेळी डॉ.निलिमा दाते, जयश्री उपाध्याय, पदमा बोरकर, मनिषा वाघमारे व डॉ. कोकिळा चांगण यांनी हा कोर्स घेतला. या कोर्समध्ये वेगवेगळे व्यायाम, योगासने, प्राणायाम व ध्यान शिकवण्यात आले. वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या प्राचार्या प्रा. रायते यांनी या कोर्सचे आयोजन करुन विशेष सहकार्य केले.
डॉ. माधव पोळ फलटणमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, श्री दादासाहेब कदम आर्ट ऑफ लिव्हिंग टिचर व फलटण विभाग टिचर प्रविराज नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्स घेण्यात आला