आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव येथे माविभागीय आयुक्त यांच्या तपासणी पथकाने शालेय कामकाज व दप्तर तपासणी निमित्ताने शाळेस भेट.

प्रतिनिधी रईस शेख सातारा:-9970112671

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

दि.24/01/2023

जि .प . प्राथमिक शाळा शिरगाव येथे मा . विभागीय आयुक्त यांच्या तपासणी पथकाने शालेय कामकाज व दप्तर तपासणी निमित्ताने शाळेस भेट दिली. सदर पथकामध्ये विभागीय आयुक्त मा. श्री . हंकारे साहेब व मा. श्री . कुंभार साहेब यांचा समावेश होता सर्व अधिकारी शालेय परीपाठात सहभागी झाले.संगीतमय आदर्श परीपाठाचे सर्वांनी कौतुक केले. शालेय परीसर व स्वच्छता पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले .शालेय रेकॉर्ड तपासणीत आवश्यक सुचना देऊन रेकॉर्ड उत्तम ठेवल्याचे नमून केले. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल कु.अनुष्का प्रदिप पवार या विद्यार्थीनीचे विशेष कौतुक केले. शालेय पोषण आहाराची चव घेतली व ती उत्तम असल्याचे चव रजिस्टरमध्ये नोंद केली . जिल्हा स्तरावर यश संपादन केलेल्या लोकनृत्याचे सादरीकरण पाहुन अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे रोख बक्षीस देऊन अभिनंदन केले. आज विभागीय आयुक्त,पुणे यांचे कार्यालयातर्फे शाळेची तपासणी करण्यात आली.यावेळी त्यांना विद्यार्थ्यांनी बसवलेले लोकनृत्य दाखवण्यात आले.आलेल्या अधिकाऱ्यांना ते खूप आवडले.यावेळी अधिकाऱ्यांनी 1000 रूपयांचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेत राबावले जाणारे विविध उपक्रम याची तपासणी केली.शाळेचा क्रीड़ा स्पर्धेतील सहभाग व यश याबाबत सर्वानी कौतुक केले.तपासणी पथकाने दिलेल्या सुचने नुसार प्रत्येक शिक्षकाने तीन मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली .सर्व शिक्षकांच्या टीम वर्क व एकजुटीमुळेच शाळा प्रगती पथावर अग्रेसर असल्याचे सर्व अधिकारी यांनी आवर्जुन नमुद केले व सर्व शिरगाव टीमचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर तपासणी कामी मा. गटशिक्षणाधिकारी श्री. सुधीर महामुनी साहेब , विस्तार अधिकारी श्री वाळेकर साहेब व मेमाने साहेब, केंद्रप्रमुख श्री. रविंद्र बाबर साहेब तसेच मा.श्री . नारायण शिंदे सर, शोभा पंडित मैडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे आभार!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻एकच ध्यास गुणवत्ता विकास
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगाव.💐

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button