ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संगमनेर:-श्रीमती तान्हूबाई तळोले व श्रीमती वेणूबाई घोगरे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
संगमनेर वार्ताहर संगमनेर तालुक्यातील औरंगपुर येथील श्रीमती तान्हूबाई पुंजाजी तळोले व श्रीमती वेणुबाई बन्सी घोगरे यांचा सहस्र चंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता औरंगपुर हनुमान मंदिर येथे संपन्न होणार आहे .या प्रसंगी ह. भ. प. अनिताताई जाधव यांचे जाहीर हरि किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे .तसेच दुपारी सत्यनारायण महापूजा व कार्तिकी व श्रावणी यांच्या नामकरण विधी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
एखाद्या व्यक्तीचे वय ८० पूर्ण झाले की सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा केला जातो. म्हणजे त्याच्या आयुष्यात १००० पौर्णिमा येतात याचा अर्थ असा कि त्यांने ८० वर्षात १००० वेळा पूर्ण चंद्र बघितलेले आहेत तसेच कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाऊसाहेब पुंजाजी तळोले. सौ मंदाबाई भाऊसाहेब तळोले. सचिन भाऊसाहेब तळोले. संगीता सचिन तळोले. चि. सोमनाथ भाऊसाहेब तळोले. भाऊसाहेब काशिनाथ ढेरंगे . सौ कल्पना भाऊसाहेब ढेरंगे यांनी केले आहे