क्राईम न्युजताज्या घडामोडीदेश विदेश

मणिपूर:-भाजपा नेते लैशराम यांची भरदिवसा गोळया घालून हत्या.

प्रतिनिधी शफिक शेख:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

भाजपा नेते लैशराम यांची भरदिवसा गोळया घालून हत्या.
मणिपूर, दि. 25 (शफिक शेख) :- भारतीय जनता पक्षचे राज्य विभाग माजी सैनिक सेलचे निमंत्रक असलेल्या लैशराम रामेश्वर सिंग यांची आज भरदिवसा गोळया घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना त्यांच्या थोबळ येथील घराजवळ घडली. हत्येनंतर एका आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं असून दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीसअधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रजिस्ट्रेशन नंबर नसलेल्या कारमधून आलेल्य हल्लेखोरांनी लैशराम यांच्या घराजवळ हल्ला केला. यावेळी आरोपींनी दोन गोळ्या लैशराम यांच्या दिशेने झाडल्या. यामध्ये त्यांच्या छातीत गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. 46 वर्षीय केशोरजित या मुख्य आरोपीने इम्फाळमध्ये पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्याच्याकडून एक परवाना पिस्तूल, दोन मॅगजिन आणि नऊ काडतूसं जप्त केली आहेत. भाजपाने या हत्येचा निषेध करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button