खटाव:-हेडलाईन – वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वनविभाग मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण
विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण आक्रमक
खटाव – प्रतिनिधी अनमोल गुरव
खटाव तालुका वनविभाग अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीच्या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी विशाल आप्पासो चव्हाण मायणी , ता . खटाव , जि . सातारा यांनी आक्रमक भूमिका घेत मायणी येथे वनविभाग कार्यलयाबाहेर उपोषणाचा इशारा दिला आहे.
खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे उपोषणाचे निवेदन देण्यात आले असून त्यात असे म्हंटले आहे की, खटाव तालुक्यातील संपूर्ण वनविभाग क्षेत्रात आलेल्या कामांच्या प्रती प्रत्यक्ष आलेला निधी व खर्च झालेला निधी यात कमालीची तफावत आढळून येत असल्याने या संपूर्ण प्रकरणी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांची विभागीय चौकशी करून आलेल्या निधीचा व खर्चाचा तपशील तपासाच्या मागणीसाठी वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द देशाच्या प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि . २६ जानेवारी २०२३ रोजी खटाव तालुक्यातील मायणी पंढरपूर रोड वरील ऐतिहासिक व निसर्ग संपदा असणाऱ्या व स्थानिक वनविभाग यांच्याकडून दुर्लक्षित झालेल्या मायणी ब्रिटिशकालीन तलाव व मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी बेमुदत उपोषणास आम्ही बसणार आहोत .सदर निवेदन विभागीय कार्यालय कोल्हापूर,जिल्हाधिकारी सातारा ,उपवनसंरक्षक,पोलीस अधीक्षक,प्रांत खटाव यांनाही देण्यात आले आहे.
फोटो ओळी – खटाव तालुका वनविभाग अंतर्गत पोलीस विभागाच्या कारभाराविरुद्ध उपोषणाचे निवेदन तहसीलदार जमदाडे यांना देताना सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण …