ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-मतदान करण्यासाठी 45- सातारा लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी – जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर
RPS STAR NEWS
मतदान करण्यासाठी 45- सातारा लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी
– जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि. 15 :- 45- सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघामधील सर्व नागरिकांना मतदान करता यावे यासाठी मंगळवार दि. 7 मे राजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी 45- सातारा लोकसभा मतदार क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. शासनाकडील अधिसूचना शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील. या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेऊन नागरिक व महिलांनी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान करावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.