ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निमसोड:-महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या वतिने राबवण्यात येत असलेल्या मिशन धाराऊ माता दुग्धामृत अभियानाचा शुभारंभ.

प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:- 9881355582

संपादक:- प्रल्हाद चव्हाण:-8208717483

निमसोड येथे मिशन धाराऊ मोहिम

निमसोड ता.खटाव येथे महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या वतिने राबवण्यात येत असलेल्या मिशन धाराऊ माता दुग्धामृत अभियानाचा शुभारंभ अंगणवाडी निमसोड येथे उत्साहात संपन्न झाला.१ऑगष्ट ते ३० संप्टेबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची जनजागृती करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.या अभियानाचा शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बँकेचे संचालक चंद्रकांत मोरे सर म्हणाले बालमृत्यु कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांच्या जन्माच्या अधिपासुनच लक्षपुर्वक खबरदारी घेणे गरजेचे आहे.यासाठी महिला व बालविकास व जिल्हा परिषदेने स्तनपान व शिशुपोषण या विषयाची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी” मिशन धाराऊ माता दुग्धामृतम् “हे अभियान हाती घेतले आहे .ग्रामपंचायत निमसोड हद्दीतील प्रत्येक घराघरात या अभियानाची माहिती देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निमसोड गावातील सर्व अंगणवाडी मधील पटावरील मुलांना निमसोड मधील मान्यवर सरपंच महेंद्र देशमुख,काकासो मोरे,सुनिल मोरे,शशीकांत मोरे बापुराव घाडगे,साद फोऊडीशनचे हर्षद मोरे यांनी पौष्टिक आहाराचे खाऊ वाटप केले
सातारा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्यकार्यकारी रोहिणी ढवळे मँडम तसेच प्रकल्पाधिकारी किरण उदमले साहेब,पर्यवेक्षिका लिना सांळुखे मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम निमसोड अंगणवाडी केद्रांत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास सरपंच महेंद्र देशमुख,मार्केट कमेठी संचालक काकासो मोरे,सुनिल मोरे,बापुराव घाडगे,शशीकांत मोरे,साद फौऊडीशनचे हर्षद मोरे,गरोदर माता,स्तनदा माता,किशोरवयीन मुली,प्राथमिक शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका व गावातील महिला उपस्थित होत्या.प्रास्तविक व आभार संगिता मोरे यांनी उपस्थितांचे मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button