खटाव:-चोराडेतील असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी कटीबद्ध:विक्रमशिल कदम.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
चोराडेतील असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी कटीबद्ध:विक्रमशिल कदम.
पुसेसावळी:असंघटित कामगार व इ श्रम कार्ड अशा शासनांच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये चोराडे गावातील सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने गावातील कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी केले.ते चोराडे (ता. खटाव) येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी पुसेसावळीचे युवा नेते महेश पाटील, मातृभूमी फ्रेश ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन श्रीकांत पिसाळ,
नवनाथ पिसाळ,माजी चेअरमन विजय पिसाळ,माजी व्हा.चेअरमन भाऊसो जगताप,सचिन पिसाळ, मच्छिंद्र पिसाळ संजय अवघडे,रामदास पिसाळ, अभिजित पिसाळ, प्रदीप पवार,विष्णुपंत पिसाळ, पांडुरंग पिसाळ, विठोबा जाधव, शरद पिसाळ, अशोक पाटील, प्रशांत पिसाळ, चंद्रकांत पिसाळ,हणमंत मदने,आदिची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कदम म्हणाले की
बांधकाम मजूर,शेत मजूर योजने अंतर्गत येणारे सर्व असंघटित कामगार वर्ग यांना शासना कडून दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवला जाईल,
चोराडेचे युवा नेते श्रीकांत पिसाळ म्हणाले की,चोराडे गावामध्ये आणि पुसेसावळी गटातील इतर अनेक गावांमध्ये विक्रम बाबांच्या माध्यमातून अनेक असंघटित कामगारांना या योजनेचा लाभ मिळत आहे. अनेक गावांमध्ये असंघटित कामगारांसाठी दोन्ही वेळचा पोषण आहार,तसेच विविध योजने अंतर्गत
अनेक सेवा सुविधा पुरवल्या जात
आहेत.
या कार्यक्रमास आकाश जाधव,आनंदा जाधव,विलास पिसाळ,संभाजी कुंभार, प्रविण मोहिते,राजेंद्र मोहिते,उमेश मोहिते गणेश पिसाळ,उमेश पिसाळ,प्रकाश लोकरे,बाळू लोकरे,आबासो कणसे,
श्रीधर जाधव,वामन अवघडे,अतुल चव्हाण,हणमंत मोहिते,सुनील जाधव, उत्तम कांबळे,सदाशिव साळुंखे,सदाशिव मदने,अधिक अवघडे,दादा अवघडे,संतोष पिसाळ, शामराव पिसाळ आदिसह ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.प्रास्ताविक श्रीकांत बाबुराव पिसाळ यांनी केले, तर आभार आकाश जाधव यांनी मांडले.