आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-मुंबई महानंदा दूध संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश आबा परजणे यांची प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील स्मृतीस्थानच भेट.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य  संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव(वार्ताहर ) कोडीराम नेहे

महाराष्ट्र राज्य सहकारी महानंदा दूध संघाचे नवनिर्वाचित चेअरमन यांनी प्रवरानगर येथे भेट देऊन स्वर्गीय पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिस्थळास व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थानास अभिवादन केले.                            महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महानंदा मुंबई संघाचे नवनिर्वाचित चेअरमन पदी माननीय श्री राजेश नामदेवराव परजणे पाटील यांची निवड झाली.    त्यांनी प्रथम प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृतिस्थळास व पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थानास अभिवादन केले.यावेळी महानंदाच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय दादा विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील तसेच विखे कारखान्याच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संचालक कैलासराव सूर्यभान तांबे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कामगार संचालक पोपटराव वाणी, कारखान्याचे कार्यकारी संचालक ए के भागडे, मुख्यशेतकी अधिकारी जी एन चेचरे, प्रवरा शिक्षण संस्थेचे डायरेक्टर ए वाय पानगव्हाणे, बोर्ड सेक्रेटरी एम एस चौधरी, सेफ्टी ऑडिटर सुकलाल खर्डे, सुरक्षा अधिकारी एन बी डेंगळे, डेप्युटी चीप अकाउंटंट ऊसतोड संस्था बी के शेळके, लीगल ऑफिसर एडवोकेट सदाफळ, सॅनिटेशन इन्स्पेक्टर गुरसळ साहेब यांच्यासह अधिकारी कामगार उपस्थित होते.                                 फोटो मुंबई महानंदा दूध संघाच्या चेअरमन पदी मा राजेश आबा परजणे यांची निवड झाल्याबद्दल विखे कारखान्याच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संचालक कैलासराव सूर्यभान तांबे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कामगार संचालक पोपटराव वाणी, कारखान्याचे कार्यकारी संचालक ए के भागडे, मुख्यशेतकी अधिकारी जी एन चेचरे, व अधिकारी दिसत आहे.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button