सातारा:-श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथील विद्यार्थी व शिक्षकांची वर्ये जि.सातारा येथील रयत सायन्स अँड इनोव्हेशन विज्ञान सेंटरला भेट.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
विज्ञानाची कमाल ……….मुलांची धमाल.
श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथील विद्यार्थी व शिक्षकांची वर्ये जि.सातारा येथील रयत सायन्स अँड इनोव्हेशन विज्ञान सेंटरला भेट.
आज गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी ब्रह्मपुरी येथील माध्यमिक आश्रमशाळेतील इ.५ वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांना अध्यापन करणारे सर्व शिक्षक यांनी वर्ये जिल्हा सातारा येथील रयत सायन्स अँड इनोवेशनल ऍक्टिव्हिटी सेंटरला भेट दिली.
रंग निर्मिती , हवेचा दाब , चक्रीवादळ , न्यूटनच्या गतीविषयक नियमांच्या माहितीसह जादुच्या प्रयोगात विज्ञानाची गंमत कशी असते? याविषयी विज्ञान केंद्रातील श्री.सोनवले सर व त्यांचे सहकारी श्री.मोरे सर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
वैज्ञानिक बागेत खेळता खेळता वैज्ञानिक संकल्पनाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
मोठ्या उत्साहाने मुलांनी विज्ञान सहलीचा आनंद घेतला. यातून एक वेगळे विज्ञानविश्व मुलांना अनुभवता आले.