फलटण:-प्रबोधनातून परिवर्तन झाले पाहिजे : प्रा.वसंत हंकारे
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रबोधनातून परिवर्तन झाले पाहिजे : प्रा वसंत हंकारे
फलटण :
आई वडिलांच्या कष्टाची जाणीव मुला मुलींना असली पाहिजे. आपलं शिक्षण आरोग्य राहणीमान चांगलं राहावं यासाठी आई वडील रात्रंदिवस झटत असतात. काबाड कष्ट करत असतात त्याच्या बदल्यात आपन आपल्या पालकांना काय देणार आहोत .याचा सखोल विचार तरुण पिढीने करून ठेवणे आवश्यक झाले आहे .महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवताना आई वडिलांचे संस्कार ही डोळ्यासमोर ठेवा आता प्रबोधना ऐवजी परिवर्तन झाले पाहिजे आणि प्रत्येकाने ते आपल्या स्वतः पासून सुरू केले पाहिजे असे क्रांतिकारक विचार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक आणि सामाजिक विचारमंच चौधरवाडी आयोजित राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त जाहीर व्याख्यानात प्रा वसंत हंकारे यांनी चौधरवाडी ग्रामस्थांसमोर काढले
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त चौधरवाडी ता फलटण येथे सुरवातीला प्रमुख व्याख्याते प्रा वसंत हंकारे ,नवनियुक्त सरपंच मा तुकाराम कोकाटे प्रथमिक शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत सोनवलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली
यावेळी बोलताना प्रा हंकारे यांनी चौधरवाडी ग्रामस्थांचे कौतुक करताना इतक्या छोट्या गावात व्याख्यानाची एवढी समृद्ध परंपरा आहे हे खूपच परिवर्तनवादी आहे असे मत व्यक्त केले यावेळी चौधरवाडी ,मलटण व फलटण परिसरातून महिला व नागरिक उपस्थित होते