कराड:-वेणूताई चव्हाण काॅलेज, कराडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वेणूताई चव्हाण काॅलेज, कराडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.
कराड: (दि. 18 जानेवारी, प्रतिनिधी) येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सातारा येथे झालेल्या विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले.
कु. सोनवणे राजनंदिनी तुकाराम (इ.12वी कला) हिने गोळा फेक या क्रीडा प्रकारात (12.28 मी.)19 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु. शेवाळे निकीता हिम्मत ( इ.12वी कला ) हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारात (34.80मी.) 19 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांक मिळविला. 17 वर्षाखालील मुले गटात श्री. जाधव शिवराज राजेश (इ.11वी कला) याने हातोडा फेक (44.90मी.) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व गोळा फेक (12.29मी.) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. कु. थोरवडे दिक्षा मानसिंग (इ.11वी कला) हिने 17 वर्षाखालील मुली गटात हातोडा फेक (45.28मी.) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत फ्री-स्टाईल (79 किलोगट) या क्रीडा प्रकारात श्री. कुंभार संकेत संजय (इ.12वी वाणिज्य) याने 19 वर्षाखालील मुले गटात प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मा. श्री. प्रकाश पांडूरंग पाटील (बापू) जनरल सेक्रेटरी श्री.शिवाजी शिक्षण संस्था विदयानगर, कराड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल.जी. जाधव यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. व आगामी बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा व राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना प्रा. दिग्वीजय पाटील, प्रा. अमरसिंह सावंत, प्रा. कश्यप सर, प्रा. सुनिता जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.