ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-राज ठाकरेंविरोधात परळी न्यायालयाने काढलेल्या ‘‘अजामीनपात्र वॉरंट’’चा निकाल.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

राज ठाकरेंविरोधात परळी न्यायालयाने
काढलेल्या ‘‘अजामीनपात्र वॉरंट’’चा निकाल.

मुंबई, दि. 18 (शफिक शेख):- परळीतील धर्मापुरी पॉईंटवर 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बसेसवर केलेल्या दगडफेकीमुळे बसचे खूप नुकसान झाले होते. याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना आणि चिथावणी दिल्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरील कारवाई म्हणून परळी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी अजामीनपात्र वॉरंट जारी केेला होता. त्या वॉरंटला उत्तर म्हणून राज ठाकरे आज परळी न्यायालयात स्वतः हजर होते. त्यावरील सुनावणी घेत न्यायालयाने राज ठाकरे यांना पाचशे रूपयांचा दंड ठोठावत सदर अटक वॉरंट रद्द केल्याने राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.
राज ठाकरे यांना 2008 मध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. त्यावेळी बसचे नुकसान झाले होते. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणी दिल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या सुनावणीस आज ठाकरे हे परळी न्यायालयात आले होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button