आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-प्रदूषण टाळून वसुंधरेचे संवर्धन करावे प्राचार्य नानासाहेब शेळके.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव (वार्ताहर):- प्रत्येकाने पर्यावरणाला घातक ठरणारी प्रदूषण टाळून वसुंधरेचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन प्राचार्य नानासाहेब शेळके यांनी केले.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच भूगोल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भूगोल विषयाचे शिक्षक ज्ञानदेव दवंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नानासाहेब शेळके हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरद दुधाट हे उपस्थित होते. त्यांनी भूगोल दिनाचे महत्त्व सांगून पर्यावरणाविषयीची जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. प्राचार्य शेळके यांनी भूगोल आणि पर्यावरण यांचा सहसंबंध विशद करून वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे, असे सुचविले. यावेळी शिवाजी काळे, जितेंद्र खैरनार, हिरा चौधरी, दीप्ती रूपवते, सुवर्णा भोर, प्रतिभा ठोकळ, प्रतीक्षा कडू, अंजुम तांबोळी, प्रियंका लोंढे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी जवाहरलाल पांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.