फलटण:-खामगावमध्ये पौष्टिक तृणधान्यवर महिला बचत गटांना मार्गदर्शन.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
खामगावमध्ये पौष्टिक तृणधान्यवर महिला बचत गटांना मार्गदर्शन
फलटण :
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाचे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे त्यामुळे आगामी २०२३ हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात खामगाव येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अंतर्गत अनुदान याचे महत्त्व व महिला बचत गट या मार्गदर्शनावर कार्यक्रम संपन्न झाला
जिल्हास्तरावर आयोजित कार्यशाळेच्या कृषी महोत्सव या अंतर्गत तृणधान्य पिकातील पोषण मूल्य व मानवी आहारातील महत्त्व लोकांच्या लक्षात आणू देण्यासाठी पथनाट्यांचे आयोजन करने,कार्यशाळेत पौष्टिक तृणधान्य पिकाच्या लागवडीपासून ते काढणे पर्यंत त्यानंतर प्रायमरी व सेकंडरी प्रक्रिया उद्योग इत्यादी विविध विषयासंदर्भात तज्ञ व्यक्तींची निवड करून त्यांचे चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित करणे, त्याचबरोबर पौष्टिक तृणधान्य पिकापासून तयार होणाऱ्या विविध पिकांच्या पाककला व पाककृती स्पर्धांचे आयोजन करणे, याचबरोबर विविध सामाजिक संस्था जसेकी पतंजली, श्री श्री रविशंकर इस्कॉन प्रजापिता ब्रह्मकुमारी व इतर सेवाभावी संस्था यांच्या समन्वयाने कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले या सेवाभावी संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेऊन मिलेट चे महत्व पटवून देण्याकरता पौष्टिक तृणधान्य उभारावे, तसेच शेत तिथे तृणधान्य मोहीम, कृषी महोत्सव आयोजन या विविध विषयांवर चर्चासत्र राबवण्यात आले या कार्यक्रमांतर्गत प्राध्यापक वैभव गायकवाड यांनी आहारातील तृणधान्येचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले
याबाबत तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले महिलांसाठी पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत सुनिता सावंत फलटण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना कृषी सहाय्यक कुलदीप नेवसे यांनी केले त्यावेळी खामगाव गावातील प्रगतशील शेतकरी माणिक आप्पा भोसले, बाळासाहेब कुचेकर, प्रकाश पवार सर, रवी गायकवाड, भाऊ भोसले व इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. याच विषयावर विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या अंतर्गत खामगाव तालुका फलटण येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी फलटण तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, मंडल कृषी अधिकारी पूजा दुदुसकर, वैभव कृषी महाविद्यालय फलटण, कृषी पर्यवेक्षक प्रवीण शिंगाडे यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमास मंडल मधील सर्व कृषी सहाय्यक वर्ग उपस्थित होता, परिसरातील बहुमोल शेतकऱ्यांचे उपस्थिती बहुमोल होती. तसेच या सर्व कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक आरिफा शेख यांनी मानले