कराड:-कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.
कराड :(दि. 16 जानेवारी, प्रतिनिधी ) ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मौजे घोगाव येथे श्री शंकर हरी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव श्री.बी.आर.यादव, सरपंच सौ. सीमा पाटील, उपसरपंच श्री.निवास पाटील, सौ. मीनाक्षी सूर्यवंशी, श्री.एच. आर. सूर्यवंशी, प्र. प्राचार्य जाविद शेख, ग्रामस्थ व शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
Not me but you हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर घोगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबिरामध्ये विविध सामाजिक व ग्रामस्थांना उपयोगी ठरतील अशा कार्यक्रमाची रेलचेल करण्यात आलेली आहे. मंगळवार दिनांक १७ जानेवारी रोजी माती परीक्षण आणि व्यापारी दृष्टिकोनातून आधुनिक शेती या विषयावर सौ. शितल नागरे (मंडल कृषी अधिकारी उंडाळे) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तर बुधवार दिनांक १८ जानेवारी रोजी डॉ. एस.वाय.पाटील (नेत्रचिकित्सक अधिकारी) व श्री. किरण कांबळे (आयसी टीसी समुपदेशक) यांचे आरोग्य संवर्धन काळाची गरज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ जानेवारी रोजी पशुसंवर्धन व संगोपन या विषयावर व्याख्यान व गावातील दुग्धोत्पन जनावरांसाठी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दि. २० जानेवारी रोजी राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर प्रा.महेश चव्हाण यांचे व्याख्यान आणि दि. २१ जानेवारी रोजी एक तास द्या आणि शंभर वर्षे जगा या विषयावर प्रा. डॉ. संजय पाटील यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या समाज उपयोगी समाज प्रबोधन कार्यक्रमाबरोबरच गावामध्ये ग्रामस्वच्छता, नाला सफाई, बंधारा बांधणी, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन या शिबिरामध्ये केलेले आहे. या शिबिराचे नियोजन प्रकल्प अधिकारी प्रा.प्रदीप चोपडे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा.हणमंत पिसाळ, प्रा.अर्चना चव्हाण, प्रा.माया जाधव , प्रा.रोहिणी सागर इतर प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.