सातारा:-सातारा जिल्ह्यातील खत विक्रेत्यांचा बेमुदत संप.
प्रतिनिधी विशाल पिसाळ सातारा:-7447547711

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सातारा जिल्ह्यातील खते विक्रेत्यांचा बंद…
खत उत्पादकांकडून दुकानदारांना लिंकिंग एक्स एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघनासह विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी आजपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे
सरकारच्या नियमाकडे खत उत्पादकांचे दुर्लक्ष खाते पोहोच न मिळणे खतांचे वेगळे भाडे आकारणे खत ऑर्डर देऊनही न पोच देता गोडाऊनला पाठवणे त्यामुळे खत महाग पडतात . बाजारामध्ये विक्रेता लिंकिंग करतो अशी चुकीची प्रतिमा तयार होत आहे असे निवेदनातील महत्त्वाचे विषय व मुद्दे आहेत.
आज या याप्रसंगी खटाव तालुका खत विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष सुनील जाधव व यांनी माननीय तहसीलदार खटाव तालुका ,तालुका कृषी अधिकारी खटाव तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती खटाव व पोलीस स्टेशन वडूज यांना निवेदन दिले तरी या बंदला शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांनी पाठिंबा दर्शवला आहे .आज प्रत्यक्ष येऊन खटाव तालुका शेतकरी संघटना प्रवक्ते अनिल पवार पाठिंबा दर्शविला