खटाव:-माजी आयुक्त चंद्रकांत दळवी डॉक्टर दीपक शहा यांना बंधुता पुरस्कार प्रदान.
प्रतिनिधी प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
माजी आयुक्त चंद्रकांत दळवी डॉक्टर दीपक शहा यांना बंधुता पुरस्कार प्रदान.
मायणी प्रतिनिधी_____महापुरुषाचे विचार समाजाला जोडणारे व देशाच्या प्रगतीच्या दिशेने नेणारे असतात मात्र प्रत्येक जाती धर्माने महापुरुष वाटून घेण्याची स्पर्धा लागली आहे जाती-धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण होत असतान बंधुतेचे विचार पेरण्याची गरज आहे कारण बंधुता माणसे जोडण्याचे तत्त्वज्ञान शिकवते असे मत ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलना अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी पुणे येथे बोलताना व्यक्त केली. राष्ट्रीय बंधुता परिषद व औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या विद्यमाने 24 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात ते बोलत होते संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शंकर अथरे होते यावेळी खटाव तालुक्याचे सुपुत्र विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी तसेच पिंपरी चिंचवड येथील प्रतिमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक संचालक दीपक शहा यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्यशोधकी पगडी प्रबोधनाची देखणी सन्मान चिन्ह मानपत्र व पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी माजी आयुक्त चंद्रकांत दळवी व दीपक शहा यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये घालून 32 हजाराची देणगी या बंधुता परिषदेला दिली या संमेलनासाठी संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे ज्येष्ठ साहित्यिक अशोक कुमार पगारिया स्वागताध्यक्ष डॉक्टर विजय तामने प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे डॉक्टर अरुण आंधळे प्रकाश जवळकर डॉक्टर प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते सौ संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर चव्हाण यांनी आभार मानले.