क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते झेंडा दाखवून टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 शर्यतींना सुरूवात.

■ मुंबई : प्रतिनिधी

‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे 55 हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. इलाईट गटातील स्पर्धांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ड्रीम रन’ ला सुरूवात झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईकरांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.

स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार झीशान सिद्धीकी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा कन्सल्टन्सीचे उज्वल माथुर, अनिल सिंह, विवेक सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या मॅरेथॉनमध्ये इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल मेन, इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल वुमन, इलाईट ॲथेलिट इंडियन मेन, इलाईट ॲथेलिट इंडियन वुमन यासह पुर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. ड्रीम रन, सिनियन सिटीझन रन, चॅम्पीयन विथ डिसॲबिलीटी रन या प्रकारांचा समावेश करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button