आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-वंचित घटकांना न्याय देण्याचे काम प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने होत आहे. शाहीर किशोर सुदामराव सासवडे.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव प्रतिनिधी:-वंचित घटकाला न्याय देण्याचं काम प्रेस क्लब प्रवरेच्या माध्यमातून होत आहे.
प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने शाहिर किशोर सुदामराव सासवडे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात  करण्यात आला.  गेल्या अनेक वर्षांपासून शाहीर पोवाड्याद्वारे समाजप्रबोधन करत आहे सामाजिक , राजकीय धार्मिक इ. अनेक विषयावरचे  शाहीराने पोवाडे सादर केले आहेत.
प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने  जो माझा सन्मान करण्यात आला. तो माझा नसून माझ्या कलेचा सत्कार आहे . माझ्यासारख्या वंचित घटकाला  न्याय देण्याचे कार्य प्रेस क्लब प्रवरेच्या   माध्यमातून होत आहे.अशी प्रतिक्रिया  शाहीर किशोर सुदामराव सासवडे यांनी व्यक्त केले आहे.
    राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय  येथे  प्रेस क्लब प्रवरेच्या  वतीने मकर संक्राती निम्मित  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा निर्णय  प्रेस क्लब प्रवरेच्या  वतीने  घेण्यात आला. यंदाचा प्रथम वर्षाचा पुरस्कार शाहीर किशोर सुदामराव सासवडे  यांना देण्याचा मानस होता .तेव्हा मकर संक्रांतीच्या शुभ मुहर्तावर शाहीर किशोर सासवडे यांच्या सह पत्नी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला पुरस्कार देण्याचं हे पहिलेच वर्ष या पुढील काळात दर वर्षी समाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने करण्यात येणार आहे. यंदाचे हे पहिलंच वर्ष असल्याने हा सत्कार गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे येथील संस्थेचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे  अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र काकडे हे होते .प्रेस क्लब प्रवरेच्या अध्यक्ष विजय बोडखे , उपाध्यक्ष प्रमोद कुंभकर्ण , सचिव सुभाष कोंडेकर , प्रा.डॉ. अनिल बेंद्रे ,  प्रसिद्ध  प्रमुख कोडीराम                 नेहे ,चंद्रशेखर जगताप ,  दिलीप धावणे विजय थेटे,   अमित म्हसे अविनाश पंधारे  प्रकाश औताडे,  संतोष गोरे , सौ.रुपाली सासवडे  वैशाली पंधारे. आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत  हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी प्रा. रवींद्र काकडे .डॉ.अनिल बेंद्रे. प्रमोद कुंभकर्ण  यांनी आपले मनोगत व्यक्त केले व   विद्यालयातील विद्यार्थीनी  आपले  गीते साजरी केली  व  उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले .
   यावेळी शाहीर किशोर सासवडे यांनी छात्रालयातील विद्यार्थ्यांना पोवाडा कला अवगत करणे कामी मार्गदर्शन केले तसेच पोवाडा सादर करून पोवाड्याद्वारे समाजप्रबोधन कसे करावे यांचे हि विद्यार्थ्यांना धडे दिले .व पोवाडा हा  कला प्रकार जिवंत ठेवण्यासाठी शाहीर तयार होण महत्त्वाचे आहे असे शाहीर सासवडे यांनी या वेळी सांगितले
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button