ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-पंतप्रधान यांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र.

प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483.

पंतप्रधान यांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र.
पिंपरी, दि. १४ (शफिक शेख):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकोद्धाराच्या असिम कार्यातून वेळ काढत आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे शोकाकुल झालेल्या जगताप कुटुंबियांना पत्राद्वारे सांत्वन दिले. चिंचवड मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केलेले आणि एकदा विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्याबाबतचे वृत्त समजल्यानंतर त्वरित (11 दिवसानंतर) पंतप्रधान मोदी यांनी जगताप कुटुंबियांना पत्र पाठवून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. या कठीण काळात माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे लक्ष्मणभाऊ जमीनीसोबत जोडलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजपा आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
लक्ष्मणभाऊ आपल्या परिवारासाठी मजबूत आधार आणि प्रेरणास्त्रोत होते. ते आज या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची जीवनमूल्ये जगताप कुटुंबासोबत कायम राहतील, असे मोदी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांना पत्र पाठवून सांत्वन केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button