पुणे:-६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा – पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी २०२३, पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी.
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा – पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी २०२३, पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी.
क्रीडा (पुणे) ::- संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर पैलवान मुरलीधर मोहोळ यांच्यावतीने स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी येथे सुरू असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी पैलवान शिवराज राक्षे ठरला.
आज महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये माती विभागातून आलेला पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध गादी विभागातून आलेला पैलवान शिवराज राक्षे यांच्यात झाली.
विजेत्या पैलवान शिवराज राक्षे याला बक्षीस म्हणून महिंद्रा थार गाडी व रोख रक्कम ५ लाख रुपये, तसेच उपविजेता पैलवान महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि २.५० लाख रोख रक्कम आयोजकांकडून देण्यात आले.
तत्पूर्वी झालेल्या गादी विभागाच्या अंतिम लढतीत पैलवान शिवराज राक्षे ने पैलवान हर्षवर्धन सदगीर याचा ०८ – ०१ ने पराभव केला.
तर माती विभागात पैलवान महेंद्र गायकवाड याने पैलवान सिकंदर शेख यांचा ०६ -०४ ने पराभव करून महाराष्ट्र केसरी च्या अंतिम किताबासाठी पात्र ठरले…
“सरकार कडून खेळाडुंच्या मानधनात वाढ”
यावेळी उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ,हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद, यांची मानधन वाढ ४००० वरून १५०००, सोबत अर्जुन पुरस्कार प्राप्त ६००० वरून २००००, व वयोवृद्ध खेळाडूंना 3 पट मानधन वाढ व सोबत खेळाडूंना सरकारी नोकरी चे आश्वासन दिले.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)