कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडीनंतर क्षणातच कामकाजाला सुरुवात.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION- राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडीनंतर क्षणातच कामकाजाला सुरुवात.

वडूज दि: वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन पदी आण्णा वलेकर व व्हाईस चेअरमन पदी विजयकुमार शिंदे यांची निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा शिंदे यांनी बिनिरोध निवड केली नंतर लगेच पॅनल प्रमुख माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी आर्किटेक्चर व डिझायनर अभयकुमार देशमुख व चेअरमन व वाईस चेअरमन तसेच बाजार समितीचे सचिव हणमंत मदने, दत्तात्रय नलावडे यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन वडूज शेती बाजार समितीच्या आवारात व्यापारी गाळे काढण्यासाठी नियोजन सुरू केले. या वेळेला वडूज नगरीतील पत्रकार उपस्थित होते.
वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या २०२३-२०२८ कालावधीसाठी चेअरमन पदासाठी अण्णा अर्जुन वलेकर मुक्काम उंबरमळे पोस्ट कटगुण तालुका खटाव व वाईस चेअरमन पदासाठी विजयकुमार हरिदास शिंदे राहणार डाळमोडी पोस्ट बोंबाळे तालुका खटाव यांचे अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा शिंदे यांनी दिली. चेअरमन पदासाठी सुनील फडतरे सुचक व दत्तात्रय पवार यांनी अनुमोदन तर वाईस चेअरमन पदासाठी शरद पाटील सुचक व विनोद किसन घार्गे हे अनुमोदक होते.
या घोषणा झाल्यानंतर युवा नेते रणजीतभैया देशमुख, माजी आ. प्रभाकर घार्गे तसेच सर्व संचालक व नूतन पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.
तसेच पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच पॅनल प्रमुख माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तातडीने चेअरमन वाईट चेअरमन तसेच सचिव हणमंत मदने व आर्किटेक्चर व डिझाईन अभय कुमार देशमुख यांची बैठक घेऊन तातडीने वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये व्यापारी गाळे उभे करण्यासाठी डिझाईन तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५८ गाळे उभे आहेत. नवीन गाळे काढण्यासाठी पणन संचालक, पुणे यांची रीतसर २०१८ साली मंजुरी घेतली आहे. अशी माहिती शेती उत्पन्न बाजार समिती सचिव दत्तात्रय नलावडे यांनी दिली. या वेळेला वडूज नगरीचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. नूतन पदाधिकारी यांचे डॉ महेश गुरव, नांदोशी मा. सरपंच नवल थोरात, कुरोली मा. सरपंच राजूशेठ फडतरे, सर्जेराव फडतरे, राहुल सजगणे, इम्रान बागवान, मोहन देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.
_____________________________
फोटो _ले आऊट पाहणी करताना मान्यवर ( छाया – अजित जगताप)
_________________________

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button