फलटण:-योग जीवन आनंदी व सुखकर बनवायचा मार्ग: डॉ पोळ.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
योग जीवन आनंदी व सुखकर बनवायचा मार्ग: डॉ पोळ.
आर्ट ऑफ लिव्हिंग च्या भक्ती की लहर अंतर्गत योग शिबिरे
मलटण :
शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग ही भारतीयांना मिळालेली देणगी आहे याच्या नियमित वापराने आपण आपलं जीवन अधिक सुंदर बनवू शकतो असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक डॉ माधवराव पोळ यांनी केले भक्ती की लहर या आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या देशभर सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत जय भवानी हायस्कूल तिरकवाडी व जिल्हा परिषद शाळा झिरपवाडी येथे मार्गदर्शन करताना केले
फलटण येथील व्यक्ती विकास केंद्र, आर्ट ऑफ लिव्हींग यांचेवतीने १०४५ विद्यार्थ्यांचे गेली दहा दिवस रोज एक तास बालचेतनाशिबीर , नवचेतना शिबीर, प्रोजेक्ट पवित्र महिला सबलीकरण घेण्यात आले. शालेय जीवना पासूनच मुलांना योग व ध्यान याची ओळख करून देणे व त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम रहावे यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे हे शिबीर घेण्यात आले
योग शिक्षक डाॅ.अलका पोळ यांनी मुलांना प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले दादासाहेब कदम, दिनेश शिंदे, बाळासाहेब बिचुकले, रमेश फडतरे ,संतोष करगे,पुनम शिंदे,भुपाल शिंदे,डाॅ निलिमा दाते ,जयश्री उपाध्ये, वर्षा बोरकर ,डाॅ.कोकिळा चांगण ,सुनिता नायर यांनी दहा दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व मुलींची हिमोग्लोबीन व रक्तगट तपासणी करण्यात आली
दिपक कदम यांनी योगासने,सूर्यनमस्कार,प्राणायाम,ध्यान घेतले. संस्थेचे अध्यक्ष आनंदराव शितोळे हायस्कूलचे प्राचार्य काळे सर, प्रविराज नाळे यांनी उत्कृष्ठ संयोजन केले. तिरकवडी सरपंच वैशाली नाळे,उपसरपंच नानासाहेब काळूखे प्राचार्य काळे सर यांनी सर्वांचे यथोचित सत्कार केला.