वाई:-काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट रेणावळे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा यांचे संयुक्त विद्यमाने पश्चिम भागातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण.
प्रतिनिधी चेतन चौधरी वाई:-9422815184

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट रेणावळे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा यांचे संयुक्त विद्यमाने पश्चिम भागातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण.
ता. वाई येथील रेणावळे गावामध्ये दि. ८ जानेवारी २०२३ रोजी काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट रेणावळे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम भागातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण ( ट्रेनिंगचे) उद्गाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती मा. सौ. डॉ. समता बोराटे मॅडम (PHD) प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शुभहस्त्या सौ. रंजनाताई डगळे (सदस्या जिल्हा नियोजन समिती सातारा), कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री मा. आमदार श्री लक्ष्मीराव माने, स्वागताध्यक्ष मा. श्री. ज्ञनदेव शेठ सणस (संस्थापक काळेश्वरी ट्रस्ट रेणावळे), या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सौ. शोभाताई सणस (मा. उपसभापती पं. स.वाई), मा. सौ. सुनीताताई काळंबे (सदस्या पं. स. वाई), मा. सौ. जयश्रीताई राव (संचालिका ग्रामपरी संस्था पांचगणी), मा. श्री. जीवन बोराटे (सर), हे होते. सन्माननीय उपस्थिती सौ सुभद्राताई सणस (अध्यक्ष काळेश्वरी ट्रस्ट), मा. सौ. आशाताई भवानी (मॅनेजर जिल्हा मध्य. सह. बँक सातारा), सौ. संगीताताई सणस (सरपंच रेणावळे), मा. कु. मनीषाताई साबळे (कनिष्ठ अभियंता M.S.E.B. वाई ग्रामीण-२), सौ. सुचित्राताई वि. नायकवडी, सौ अश्विनीताई वि.डोंगरे, सौ सुनंदाताई सं. आंबवले, सौ. रेखाताई आ.चिरकुटे, सौ. अलकाताई अं. सणस, सौ शालनताई सं. कोंढाळकर, श्री. भाऊसाहेब सपकाळ (व्ही.एम.न्यूज मराठी), श्री दीपक जाधव (उपसंचालक ग्रामपरी पांचगणी), कु. चेतन चौधरी (R.P.S. स्टार न्यूज), श्री प्रशांत थोरवे (संचालक पश्चिम महाराष्ट्र मराठी न्यूज) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच महिलांना मार्गदर्शन (व्याख्यान) जीवनविद्या मिशन सद्गुरु श्री. वामनराव पै. यांच्या सतशिष्या ह.भ.प. सौ. माधुरीताई इंदोरे (गाडे) मंचर ता.आंबेगाव जि. पुणे यांचे स्त्री शक्ती-विकासाला गती या विषयावर व्याख्यान झाले.
कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आसरे येथील विद्यार्थिनींचा लेझीम पथकाचा कार्यक्रम घेण्यात आल. तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बादलीत बॉल टाकने अशा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. भागातील प्रत्येक गावातील महिलांचा या कार्यक्रमास सहभाग होता. कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा झाला.