मेढा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी श्री. देशपांडे ठरले उजवे…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मेढा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी श्री. देशपांडे ठरले उजवे…

मेढा दि: छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील एकमेव मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने ११ नगरसेवक निवडून आणून घसघशीत यश मिळवले आहे. सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या जागी भाजपच्या सौ.रूपाली वारागडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून उपनगराध्यक्षपदी भाजप जेष्ठ नगरसेवक श्री विठ्ठल तथा पांडुरंग देशपांडे उजवे ठरले आहेत. भाजप वरिष्ठ नेत्यांनी श्री देशपांडे यांच्या नावावर एक मत केले आहे. ही निवड एक वर्षासाठी असल्यामुळे इतरांना संधीसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
जावळी तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र मेढा नगरपंचायत आहे. या ठिकाणी भाजपचे अकरा व शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक असे सतरा नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदी भाजप व शिवसेनेला प्रत्येकी एक नगरसेवकाला संधी मिळणार आहे. आज मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी जनसंपर्क असलेले नगरसेवक शिवाजीराव देशमुख आणि विठ्ठल तथा पांडुरंग देशपांडे अशी दोन नावे गेले आठवडाभर चर्चेत होती. परंतु, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषता सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे आणि स्थानिक नेत्यांच्या आग्रह खातिर या निवडी बाबत एकमत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकूणच भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे श्री. देशपांडे यांची प्रस्तुत पदी निवड झाली. त्याचवेळी त्यांचे उपनगराध्यक्ष पद निश्चित झाल्याचे मानण्यात आले. दिलेला शब्द पाळण्यात आल्याने भाजप मधील बंडखोरी काही काळासाठी थोपविण्यात आली आहे. संख्याशास्त्रानुसार शिवसेनेला सुद्धा उपनगराध्यक्ष पदासाठी राजकीय डावपेच करणे. सध्यातरी अशक्य आहे. परंतु, मेढा नगरपंचायतीमध्ये भाजपमध्ये फूट पाडण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. ही संधी सुद्धा आता भविष्यात वापरली जाईल का नाही? याची आता उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आज रात्री भाजप वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा पुन्हा एकदा चर्चेच्या फैरी झाडल्या. त्याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही. श्री देशपांडे यांचे पारडे जड होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.




