फलटण:-रक्तदान शिबिर घेऊन आदर्श उभा केला आहे : महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483.
रक्तदान शिबिर घेऊन आदर्श उभा केला आहे : महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस.
फलटण :
क्रांतिज्योती सवित्रीमाई यांनी महात्मा फुले यांच्या बरोबर स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य तमाम स्त्रियांसाठी व शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी आजही आद्य प्रेरणास्त्रोतच आहे. फुले दाम्पत्यांचे शिक्षण सामाजिक क्षेत्रातले कार्य आज इतक्या वर्षांनी देखील ऊर्जा देणारे ठरते या निमित्ताने रक्तदान शिबीर घेऊन आदर्श उभा केला आहे असे मत संत शिरोमणी सावतामहाराज मंदिर ट्रष्ट यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष महंत श्यामसुंदर बाबा विद्वांस यांनी आपले विचार व्यक्त केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून त्यांच्या १९२व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले या वेळी सन्मानीय महिलांच्या हस्ते प्रतिमपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यामध्ये डॉ सोनाली मेहता माधुरी भुजबळ वृषाली शिंदे सुजाता शिंदे मनीषा नाळे कु सिद्धी भुजबळ मा किरण दंडिले यांची प्रमुख उपस्थिती होती
या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास मा उद्योजक नंदकुमार नाळे यांनी रुपये एक लाखाचा अपघाती विमा तसेच मा किरण दंडिले व मा बापूराव शिंदे यांचेकडून हेल्थ कार्ड देण्यात आले माऊली फाउंडेशन व सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड विश्वनाथ टाळकुटे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते व ट्रष्टी गोविंद भुजबळ यांनी केले
उपस्थित मान्यवर सुभाष अभंग रणजित भुजबळ दत्ता नाळे विकास नाळे वैभव नाळे विजय शिंदे प्रवीण फरांदे बाळासाहेब काशीद प्रशांत शिंदे अमोल रासकर सुभाष अभंग स्वप्निल शिंदे रणजीत नाळे तात्या गायकवाड तुकाराम दीपक शिंदे गायकवाड सिद्धेश भुजबळ समशेर शिंदे सर्वेश भुजबळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.