खटाव:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोराडे येथे भरला बाल बाजार – तब्बल चाळीस हजाराची उलाढाल.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोराडे येथे भरला बाल बाजार.
तब्बल चाळीस हजाराची उलाढाल.
खटाव तालुक्यातील चोराडे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,बाल बाजार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, मुलांना आर्थिक देवाणघेवाण, समाजात व्यापार उद्योग उलाढाल कशी करावी,व अनुभव यावा या हेतूने जिल्हा प्राथमिक शाळा चोराडे येथे बाल बाजार भरवण्यात आला होता, ग्रामस्थ व पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन मिळावे व अनुभव यावा यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ पालक बाल बाजारात खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.या बाल बाजारात तब्बल चाळीस हजाराची उलाढाल झाली आहे,मुले व पालक या बाल बाजारात बहरुन गेली होती,या बाल बाजाराचे उद्घाटन सरपंच कृष्णत पिसाळ, उपसरपंच सुधाकर कुंभार,यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक सर्व शिक्षक, व विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.