ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-मांढरदेव यात्रेच्या निमित्ताने जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांकडून मांढरदेव परिसराची पाहणी.

प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मांढरदेव यात्रेच्या निमित्ताने जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांकडून मांढरदेव परिसराची पाहणी.

वाई प्रतिनिधी

वाई तालुक्यातील मांढरदेवीची काळुबाई हे देवस्थान अखंड महाराष्ट्राचे आराध्य स्थान आहे येथील वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिलाच शांकभरी पौर्णिमा म्हणतात कोरोनामुळे दोन वर्ष यात्रा भरली नव्हती त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने भावीक देवीच्या दर्शनाला येणार असल्याचे देखील समजले आहे. मांढरदेव यात्रा अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी श्री काळुबाई मंदिर व मांढरदेव परिसराची पहाणी केली.
मांढरदेव यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संयुक्तपणे केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या विविध विभागानी केलेली तयारी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तयारी बाबत समाधान व्यक्त केले व कर्तव्यवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा कालावधी दरम्यान दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button