सातारा:-दिव्यगत बनुबाई येवले यांच्या प्रथम स्मृती प्रत्यर्थ रयत स्वाभिमानी संघटना प्रदेशाध्यक्ष मा.श्री सागर दादा पवार यांनी बनुबाई येवले यांच्या नातवाला घेतले दत्तक.
सह - संपादक अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
🚩रयत स्वाभिमानी संघटना🚩
आज गुरुवार दिनांक २४/०८/२०२३ रोजी दिव्यगत बनुबाई दगडु येवले यांच्या प्रथम स्मूती प्रत्यार्थ रयत स्वाभिमानी संघटना प्रदेश अध्यक्ष मा. श्री सागर दादा पवार यांनी उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर बनुताई येवले यांच्या नातवाला दादांनी दत्तक घेतले त्याच्या नोकरी पर्यंत चा सर्व शालेय खर्च दादा स्वतः करणार आहेत.
बनुताई येवले यांचा दुसरा स्मूती दिन याच्या अगोदर त्यांच्या नावाचे दिव्य असे स्मूती भवन उभारणार आहेत. त्या स्मृती भवनात बनुताई येवले यांच्या आविषयतील सर्व कार्याचे सर्व फोटो त्या भवनात लावणार आहेत.
भवनामध्ये बनुबाई यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बोधी वृक्ष भेट देण्यात आला. बोधी वृक्ष लावण्यासाठी नागपुर च्या दीक्षा भूमीतून बोधी वृक्ष च्या खोडाची माती, येवलेच्या पावन भूमीतील माती, दादर च्या चैत्यभूमी तील माती तसेच महाड च्या चवदार तळ्यातील पाणी बोधी वृक्ष लावण्यासाठी आयुष्यमान संदिप जाधव यांनी आणले आहे. व सर्व साहित्य बनुबाई येवले यांच्या कन्या कमलताई सावंत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. हे सर्व पाहून कमल ताई सावंत व त्यांचा पूर्ण परिवार भराहून गेला.
या वेळी रयत स्वाभिमानी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. सुशील भाऊ कदम, महिला जिल्हा अध्यक्ष स्वाती ताई माने, जिल्हा उपाध्यक्ष सुमित भाऊ साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रवक्ते आयु. संदिप जाधव, जिल्हा सचिव अभय जाधव, सोशल मीडिया प्रमुख सुशिल गायकवाड, वाहतूक जिल्हा आघाडी योगेश साळुंखे व कार्यकर्ते उपस्थित होते.
अभय जाधव रयत स्वाभिमानी संघटना सातारा जिल्हा सचिव