ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराविरोधात उद्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराविरोधात उद्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम.
पिंपरी, दि. 4 (शफिक शेख):- महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, त्याच बरोबर केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमान जनक वक्तव्य, आधीच बरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयावर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जनजागर यात्रेचे दि. ५ जानेवारी २०२३ रोजी पिंपरी शिववड शहरात आगमन होत आहे, यानिमित्ताने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केलेले आहे.
या जनजागर यात्रे निमीत्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ०३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ०४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर येथे ०६:०० वाजता या ठिकाणी कोपरासभा आयोजित केल्या असून शहरातील जनजागर यात्रेचा समारोप सभा पी.एम.टी. चौक, भोसरी येथे सायंकाळी ८.०० वाजता होणार आहे.
जनजागरणासाठी खासदार सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ.विद्या चव्हाण, खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, डौ आशा मिरगे, वैशालीताई नागवडे, शितल हगवणे यासह शहरातील पक्षाचे वरीष्ठ नेते, माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवक – नगरसेविका व सर्व सेलचे पदाधिकारी – कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्ष – सौ.कविता आल्हाट यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button