वाई:-वाई शहरात घरफोडी करणारे आरोपी अटकेत : २१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वाई शहरात घरफोडी करणारे आरोपी अटकेत : २१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
दि. ३०/१२/२०२२ रोजी सायंकाळी ०६.०० ते दि.३१ रोजी सायंकाळी १६.३० वाजण्याच्या दरम्यान वाई शहरात डॉ. कासुर्डे यांचे धोम कॉलणी, वाई येथील राहत्या घराचे बंद दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी आज्ञात चोरटयाने २१,०००/- रुपयचे किंमतीचे पाण्याचे नळ व एसी. चोरीस गेले बाबतची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. या घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेवून श्रीमती शितल जानवे- खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई यांना सदर अज्ञात आरोपीचा शोध घेवून पकडने बाबत आदेश दिलेले होते.
त्यानूसार बाळासाहेब भरणे, वाई पोलीस स्टेशनचे कर्मचारी व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे घटना घडले पासून वाई शहरात पेट्रोलिंग करुन व बातमीदारांचे भेटी घेवून आरोपींचा शोध घेत होते, परंतू आरोपींची माहीती मिळत नव्हती. दरम्यान बाळासाहेब भरणे,यांना सदरचा प्रकार केलेल्या तीन आरोपींची माहीती मिळाली त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागास मार्गदर्शन व सुचना दिल्या त्यानूसार गुन्हे प्रकटीकरण पथक वाई शहरात सदर आरोपीचा शोध घेत असताना सदरचे आरोपी बावधननाका, वाई येथे पाठलाग करुन पकडन्यात आले. त्यानंतर त्याचे घरझडत्या घेतल्या असता एका आरोपीचे रहाते घरातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पकडलेल्या आरोपींनीही सदरची चोरी केल्याचे कबूल केलेले आहे.
सदरची कारवाई श्रीमती शितल जानवे खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी पो. हवा. विजय शिर्के, सोनाली माने, पो. कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद
दुदुस्कर, अमित गोळे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.