पुसेसावळी:-राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी विनोद पाटील:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पुसेसावळी : 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती राहूल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘बालिका दिन ‘ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये सर्व वर्गातील विद्यार्थिनी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता शाळेचे मुख्याध्यापक हेमंत जाधव सर व पर्यवेक्षिका कविता कदम मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सौ. कोमल यादव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमांमध्ये इयत्ता तिसरी व चौथी च्या मुलींनी भाषण केले तसेच इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी बालिका दिन या विषयावर सुंदर अशी नाटिका सादर केली. सौ कविता कदम मॅडम यांनी ‘सावित्रीबाई फुले जीवन व कार्य ‘ यावर आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या शेवटी सौ ज्योती गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.