ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-टिळकनगर येथील सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चच्या नूतनीकरण कामाचे सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत उदघाटन.

प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

टिळकनगर येथील सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चच्या नूतनीकरण कामाचे सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत उदघाटन.
मनुष्याने सत्याच्या वाटेने जाऊन सन्मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा-बिशप शरदजी गायकवाड

नेवासा(प्रतिनिधी)श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील हनुमानवाडी परिसरात जेष्ठ पत्रकार रंजन साळवी यांच्या निवासस्थानाच्या आवारात १९४७ साली उभारण्यात आलेल्या सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चची अमृत महोत्सवी जयंती व चर्चच्या सुशोभीकरण कामाचे उदघाटन व कोनशिलाचे अनावरण नाशिक धर्मप्रांतचे ख्रिस्ती धर्मगुरु बिशप रेव्हरंट शरदजी गायकवाड यांच्या हस्ते व सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.मनुष्याने सत्याच्या वाटेने जाऊन सन्मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा तसेच भक्तीच्या माध्यमातून देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन बिशप
शरदजी गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केले.
सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चची अमृत महोत्सवी जयंती व चर्चच्या नूतनीकरण कामाचे उदघाटन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया नाशिक धर्म प्रांताचे प्रमुख बिशप शरदजी गायकवाड यांच्या हस्ते झाल्यानंतर चर्चला पवित्र पाण्याने आशिर्वादीत करण्यात आले.यावेळी झालेल्या प्रार्थना सभेत रेव्हरंट शमशोन बारसे, रेव्हरंट भाऊदास बारसे,रेव्हरंट डी डेव्हिड वाघमारे, रेव्हरंट डी नूतन कांबळे,ले लीडर राजेश्वर पारखे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चचे प्रमुख व्यवस्थापक जेष्ठ पत्रकार रंजन साळवी व सौ.अनिता साळवी आलेल्या ख्रिस्ती धर्मगुरुंसह सर्व धर्मीय नागरिक यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
पंच्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चचे नुतनीकरण ही भूषणावह बाब आहे,जीवनात चांगले कर्म करून जीवन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे
ज्याच्याकडे परमेश्वराबद्दल विश्वास आहे त्यांच्या पाठीशीच परमेश्वराचे वास्तव्य हे कायम असते तो आलेल्या संकटात त्याचा पाठीराखा होत असतो त्यास भेटायचे असल्यास भक्ती व त्याची नित्यनेमाने आराधना हाच पर्याय असून प्रार्थना व भक्तीच्या माध्यमातून देवाकडे जाण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी चर्चच्या बाहेरील प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चचे व्यवस्थापक जेष्ठ पत्रकार रंजन साळवी व सौ.अनिता साळवी यांनी आलेल्या धर्म गुरूंचे व मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी रांजणखोल व टिळकनगर परिसरात विकास कामांच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल जेष्ठ नेते अंबादास पाटील ढोकचौळे यांचा यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा ग्रामविकास रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी रांजणखोल गावचे सरपंच बाळासाहेब ढोकचौळे,फिलिप पंडित,पत्रकार किसन पवार, फिटनेस क्लबचे आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले,
शिवस्वराज्य बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे,
यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.नेवासा प्रेस क्लबचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम संयोजक पत्रकार रंजन साळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले उपस्थित भाविकांना प्रभू भोजन देण्यात आले.

फोटो ओळी-श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील
नूतनीकरण केलेल्या सेंट जॉन दि बॅप्टिस्ट चर्चचे उदघाटन करतांना राईट बिशप शरदजी गायकवाड समवेत रंजन साळवी,सौ.अनिता साळवी आदी धर्मगुरू दिसत आहे(छाया-सुधीर चव्हाण)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button