ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-शिवकृपा सहकारी पतपेढीचा मनमानी कारभार सर्वसामान्यांच्या उठलाय जीवावर…….

प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

शिवकृपा सहकारी पतपेढीचा मनमानी कारभार सर्वसामान्यांच्या उठलाय जीवावर…….
प्रतिनिधी शुभम भापकर
शिवकृपा सहकारी पतपेढी ने राज्यभरात कर्ज वसुलीसाठी कर्जदार व जामीनदार यांना कर्ज वसुलीसाठी मानसिक त्रास देण्याच्या हेतूने चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने कर्ज वसुली करण्यास सुरुवात केली असून त्याचा नाहक त्रास कर्जदार व जामीनदार यांना होत आहे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडून वसुलीचा दाखला प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या नियमा बाहेर जाऊन शिवकृपा पतसंस्था कर्जाची वसुली करत असल्याचे संस्थेचे सभासद कर्जदार जामीनदार यांच्याकडून बोलले जात आहे नुकतेच सातारा जिल्ह्यातील एका शाखेतील कर्जदार यांच्या थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी शिवकृपा पतपेढीने जामीनदार यांच्या पगाराचे खाते चुकीचा व खोटा आदेश देऊन नियमबाह्य पद्धतीने गोठवले त्यामुळे जामीनदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यासंदर्भात सहकार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील शिवकृपा पतपेढीने पगाराची खाती गोठवण्याचा काढलेला आदेश हा चुकीचा व नियमबाह्य असल्याचे सांगितले आहे खरे पाहता शासन परिपत्रक दिनांक 28/10/2009 नुसार जामीनदार यांचे पगार खाते गोठविता येत नाही तरी देखील शिवकृपा पतपेढीने दोनही जामीनदार यांच्या पगाराची खाती गोठवून जाणून-बुजून जामीनदार यांना अडचणीत आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे जामीनदार यांना उपजीविकेसाठी पगार सोडून कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे मुलांचे शिक्षण घराचा हप्ता या सर्व जबाबदाऱ्या त्यांना आपल्या पगारातूनच पार पाडाव्या लागत असतात हे माहीत असून सुद्धा शिवकृपा पतपेढीने त्यांची खाती गोठवली आहेत अशा नियमबाह्य व चुकीचे पद्धतीने वसुली करणाऱ्या पतपेढी विरोधात स्वतःच्या न्याय हक्कासाठी यापुढे सभासद कर्जदार जामीनदार यांनी एकत्रित येऊन उठाव करणे गरजेचे असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे.

चौकट:- सहकार भूषण पुरस्कार प्राप्त संस्थेमध्ये चाललय तरी काय……
शिवकृपा या पतपेढीस महाराष्ट्र शासनाने सहकार भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे परंतु अशा चुकीचे व नियमबाह्य काम करून लोकांचा मानसिक छळ करणाऱ्या पतपेढीला सहकार भूषण पुरस्कार देणे योग्य आहे का याचाही विचार इथून पुढील काळात होणे गरजेचे आहे.

चौकट:- सहकार आयुक्त कार्यवाही करणार का….
राज्यातील सर्व सहकारी संस्थांवर अंकुश ठेवण्याचे काम हे सहकार आयुक्त यांच्याकडून केले जाते अशा पद्धतीने खोटे आदेश देऊन चुकीचे व नियमबाह्य काम करणाऱ्या व कर्जदार जामीनदार यांची पिळवणूक करून नाहक मानसिकत्रास देणाऱ्या शिवकृपा पतपेढी वर खडक कार्यवाही करणार का यापुढे देखील सर्वसामान्य कर्जदार जामीनदार यांना देशोधडीला लावण्यासाठी शिवकृपा पतसंस्थेला बळ देऊन पाठीशी घालणार हे पाहणे गरजेचे आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button