मायणी:-ज्योतिष शास्त्रातील बहुमूल्य कार्याबद्दल प्राध्यापक दिलीप पुस्तके सन्मानित.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
ज्योतिष शास्त्रातील बहुमूल्य कार्याबद्दल प्राध्यापक दिलीप पुस्तके सन्मानित.
मायणी प्रतिनिधी__संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आयोजित चौथे राज्यस्तरीय एक दिवशीय अधिवेशन व पदवीदान समारंभात ज्योतिष शास्त्रातील बहुमूल्य कार्याबद्दल दैनिक तरुण भारत चे मायणी प्रतिनिधी माजी प्राचार्य दिलीप पुस्तके यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे प्रमुख पाहुणे नंदकिशोर जकातदार विजय जकातदार मालती शर्मा यांनी सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले यावेळी बोलताना डॉक्टर विकास खिलारे
यांनी सांगितले की 2018 पासून प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले आहेत त्यामुळेच आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत सत्कारच उत्तर देताना प्राध्यापक दिलीप पुस्तके आणि सांगितले की आज भारताची अस्मिता हरवली आहे स्वार्थ शूद्रता प्रांतीय ता जातीयता व विचार शून्यता यांच्या माध्यमातून देशावर धुके दाटले आहे अशावेळी ज्योतिष व अध्यात्म हेच देशाला संजीवनी देऊ शकतात हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाची पोच पावती आहे यापुढेही मी कार्यरत राहणार असे सांगितले यावेळी नंदकुमार जोशी सचिन बेहेरे आरती घाटपांडे जवाहर मुथा पल्लवी चव्हाण बाळकृष्ण कुंभार धामणेर प्रिया मालवणकर प्रसन्न मुळे सिद्धी पवार सभापती बांधकाम सातारा सौ स्वाती पैलवान तसेच असंख्य विद्यार्थी ज्योतिष प्रेमी उपस्थित होते.