फलटण:-गौणखनिज वाहतुक करणाऱ्या १५ ब्रास माती व मुरूम वाहणार्या ४ हायवा गाड्यांवर महसुल विभागाची कारवाई
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
फलटण /प्रतिनिधी-
आळंदी – पंढरपुर पालखी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे कडून शासनाचा कोट्यावधीचा महसुल बडवून परवाना न घेता गौणखनिज वाहतुक करणाऱ्या १५ ब्रास माती व मुरूम वाहणार्या ४ हायवा गाड्यांवर महसुल विभागाने कारवाई केली आहे.
याबाबत महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारी वरुन महसूल विभागाने फलटण – आसू रोड आसू पाटी धुळदेव जवळ विनापरवाना अनधिकृरीत्या माती व मुरूम वाहणारे १५ ते २० हायवा गाड्या जात असताना त्यातील ४ गाड्या महसुल विभागाने पकडल्या असून गाडी चालकाकडे गौण खजिन वाहतुक परवाना आल्याबाबत विचारणा केली असता तो आढळून न आल्याने संबधीत ४ गाड्या धुळदेव तलाठी अभिजीत मोरे, धुळदेव पोलीस पाटील पवन आडके यांनी ताब्यात घेवून तहसिल कार्यालय फलटण येथे तहसील आवारात आणून जमा केल्या. सदर चार गाड्यांचा पंचनामा केला असता ५ ब्रास माती व १० ब्रास मुरुम त्यामध्ये आढळून आला. तसेच विना परवाना मुरूम वाहतुक करणाऱ्या ३ हायवा गाड्या तलाठी मोरे व सामाजिक कार्यकर्ते यांचे समोर पळून गेल्या. सदर गाड्या या आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे यांच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेली अनेक महिन्यापासून फलटण तालुक्यातील पालखी महामार्गाचे काम सुरू असून या कामाकडे महसूल अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग तसेच हायवे प्राधिकरण यांचे सर्वांचे दुर्लक्ष असून महसूल अधिकारी विशेष करून होत असलेल्या अनधिकृत गौणखणीजचा उपसा व विक्री याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असून या दुर्लक्षितपणामुळेच संबंधित ठेकेदाराचे फावले असून दिवसासह रात्रीपण अनधिकृत बेकायदेशीर कामाचा सपाटा सुरु असून आज पकडलेल्या विना परवाना गाड्यावरून आर.के.चव्हाण इन्फाने शासनाला किती रूपयांचा महसुल बुडविला असेल यांची कल्पना न केलेली बरी. फलटण तालुक्यातील ज्या गावातुन मुरूम व मातीचा उपशा होत असलेल्या शेत जमीनीची त्रयस्थ विभागांकडून चौकशी करण्याची आवश्यकता असून उपसा करण्यात आलेल्या शेत जमीनीचा पंचनामा व मोजमाप करण्याची गरज असून या तपासात बुडालेला कोट्यवधीचा महसूल उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर च्या विनापरवाना चालू असलेल्या गौण खनिज करणाऱ्या ठेकेदारावर महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे फलटण तालुक्यातील सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.