औरंगाबाद:-विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत बाभूळगाव च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद शहर:9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत बाभूळगाव च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली ती अशी – 14 वर्षाआतील मुली – आरुषी गणेश तुपे – 80 मीटर हडल्स – द्वितीय. 17 वर्षाआतील मुली – रेवती संजय तुपे – 400 मीटर हडल्स – प्रथम, ऋतुजा रमेश गायकवाड – 3 की. मी. चालणे – द्वितीय, 4 बाय 400 मीटर रिले – ऋतुजा पवार, साक्षी तुपे, ऋतुजा गायकवाड, रेवती तुपे, पल्लवी तुपे चा संघ द्वितीय स्थानी राहिला तर प्रमोद बाळनाथ तुपे 5 किलोमीटर वाकिंग मध्ये चतुर्थ स्थानी राहिला. 19 वर्षा आतील मुली – प्रीती एकनाथ गायकवाड – भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला,अमृता सुखदेव गायकवाड – 3 की. मी चालणे – प्रथम व क्राॅसकंन्ट्री – द्वितीय, गितांजली भगवान राऊत – 3000 मीटर धावणे – तृतीय व क्राॅसकंन्ट्री – चतुर्थ तर कल्याणी भोपळे – क्राॅसकंन्ट्री – सहावी. वरील प्रथम व द्वितीय क्रमांक तसेच क्राॅसकंन्ट्री स्पर्धेत 1 ते 6 क्रमांकात नंबर पटकावणाऱ्या जयहिंद च्या आरुषी, रेवती, ऋतुजा, प्रीती तसेच जयहिंद च्या माजी खेळाडू अमृता, गीतांजली, कल्याणी या सात खेळाडूंची पुणे येथे जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक एस.पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव पाटील तुपे, मुख्याध्यापक पी. जी. बोरणारे व सर्व शिक्षक वृंदांनी वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.प्रतिनिधी,शिवनाथ चिकणे