पुणे पिंपरी:-नवीन वर्षाच्या चांगल्या सुरूवातीसाठी वाहतूक शाखेची विविध भागांत कारवाई.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
नवीन वर्षाच्या चांगल्या सुरूवातीसाठी
वाहतूक शाखेची विविध भागांत कारवाई.
पिंपरी, दि. 30 (शफिक शेख):- 2022 मधून 2023 मध्ये पदार्पण करीत असताना पिंपरी शहराच्या या सुखाच्या क्षणाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेमार्फत चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे, चिखली या सर्व मुख्य औद्योगिक आणि आयटी परिसरांमध्ये दिनांक 29/12/2022 रोजी कारवाई करण्यात आली. यामध्ये मद्य सेवन करून वाहन चालविणा-या 66 जणांवर, धोकादायकरित्या वाहन चालविणा-या 62 जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच हीच कारवाई पुढील दोन दिवस चालू राहणार असल्याचे सहा. पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सतीश माने यांनी सांगितले.
नव्या वर्षात पदार्पण करीत असताना नागरिकांच्या जिवीताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेची असून त्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचेही माने यांनी सांगितले. नागरिकांनी मद्य प्राशन करून गाडी चालवू नये आणि त्यामुळे त्यांचे आणि इतरांच्या जीवितास आणि मालमत्ते नुकसान होवू नये म्हणून सदर कारवाई ही पुढील आणखी दोन दिवस चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सदरची कारवाई ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे तसेच पोलीस उपायुक्त ककासाहेब डोळे, विवेक पाटी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.