क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-वाईच्या दिशा प्ले स्कूल मध्ये स्पोर्ट डे उत्साहात साजरा…..

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

वाईच्या दिशा प्ले स्कूल मध्ये स्पोर्ट डे उत्साहात साजरा…..
मंगळवार दि २७/१२/२०२२ रोजी दिशा प्ले स्कूलचा स्पोर्ट डे अगदी उत्साहात साजरा झाला.सदर कार्यक्रम माननीय श्री बाळासाहेब भरणे वाई सिनिअर पोलीस ऑफिसर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडला. यावेळी छोट्या बाळगोपाळांनी विविध खेळात भाग घेवून प्रावीण्य मिळविले. यावेळी मा. बाळासाहेब भरणे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देवून मुलांचे कौतुक केले आणि खेळाचे महत्व सांगितले. याप्रसंगी मा.श्री .अनिल सावंत साहेब यांनीही मुलांचे कौतुक करून पारितोषिक वितरण केले. याचबरोबर सौ.ममता देशमुख नायब तहसीलदार वाई, सौ वैशाली जायगुडे निवासी नायब तहसीलदार वाई आणि भारत विकास परिषद अध्यक्ष डाॅ.वॄषाली फरांदे यांच्या उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला.
सौ ममता देशमुख व सौ वैशाली जायगुडे यांनी दिशा पब्लिक आणि दिशा प्ले स्कूल मधील अनुभव सांगून मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच डाॅ. वृषाली फरांदे यांनी मुलांच्या शारीरीक व बौध्दीक वाढीसाठी आवश्यक असणा-या आहाराचे पालकांना महत्व समजावून सांगितले व मोबाईल सारख्या भयंकर खेळापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले.
दिशा संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री प्रा. नितीन कदम सर ,सेक्रेटरी प्रा.सौ.रूपाली कदम मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले प्राचार्य मा.सय्यद सर ,दिशा प्ले स्कूलच्या व्यवस्थापक सौ दिपा कदम व सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button