फलटण;-वडजल येथे खोडवा पीक व्यवस्थापन कार्यशाळा शेतीत माती व पाणी हे चिरंतन सत्य : नितीन शिंदे.
प्रतिनीधी आशीतोष चव्हाण:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वडजल येथे खोडवा पीक व्यवस्थापन कार्यशाळा
शेतीत माती व पाणी हे चिरंतन सत्य : नितीन शिंदे
फलटण :
शेती मध्ये पाणी आणि माती हे चिरंतन सत्य असते कोणत्याही पिकाला उत्तम प्रतीची जमीन व उत्तम प्रतीचे पाणी आवश्यक असते .ऊस पिकासाठी सेंद्रिय खतांचे महत्व अधिक असून जमिनीमध्ये जिवाणूंचे कार्य अधिक महत्त्वाचे असते शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करत पाचट न जाळता ते जमिनीत जिवाणूंच्या मार्फत कुजवणे अधिक फायद्याचे असते असे मार्गदर्शन कृषीतज्ज्ञ तालुका कृषीसहाय्यक नितीन शिंदे यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी सेवा ऊस उत्पादक शेतकरी समूह वडजल तालुका फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस खोडवा पिक व्यवस्थापन व पाचट कुटी या विषयावर केले
सूर्यकांत अडसूळ यांचे शेतात प्रात्यक्षिक दाखवताना व मार्गदर्शन करताना सुपर केन नर्सरी व ऊस लागवड पद्धती या विषयावर राहुल कांबळे कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले तसेच ऊस पिकात जैविक कीटकनाशके व खतांचा वापर या विषयावर अरविंद नाळे यांनी मार्गदर्शन केले सौ बोराटे मॅडम कृषी सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमात खताळ यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन पाचट कुटी संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी व वडजल गावचे सरपंच संगीताताई ढेंबरे, विजयकुमार भगवान ढेंबरे, पोलीस पाटील विकास पिसाळ निंभोरे सरपंच कांचनताई निंबाळकर ,वाठार निंबाळकर च्या सरपंच सुवर्णाताई नंदकुमार नाळे काशीदवाडी सरपंच स्वाती रमेश अनपट संतोष फरांदे गुरुकृपा ऍग्रो सर्विसेस या कृषी केंद्र चे संचालक वडजल. इत्यादी बहुसंख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
सदर कार्यक्रमा शेवटी शसुर्यकांत अडसूळ यानी कृषी सेवा ऊस उत्पादक शेतकरी समूह यांनी तयार केलेल्या माऊली अग्रो या सेंद्रिय खताची ,गांडूळ खताची माहिती माहिती देऊन यांनी उपस्थितांचे आभार मानले