पुणे:-पॅरा नेमबाज खेळाडू भारतीय संघाच्या निवड पात्रता फेरीत.
प्रतिनीधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पॅरा नेमबाज खेळाडू भारतीय संघाच्या निवड पात्रता फेरीत.
पुणे, दि. 29 (रफिक शेख ) : महानगरपालिका व पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी खेळाची जनजागृती प्रसार प्रचार मध्ये पुण्याचे पॅरा नेमबाज खेळाडू भारतीय संघाच्या निवड फेरीत पात्र ठरले.
आपल्या शहराचे राज्याचे देशाचे नाव आतंरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा आयोजित करून त्यातुन ११ कौशल्य पूर्ण नेमाबाजींची निवड करून त्यांना मोफत विशेष प्रशिक्षण राष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक आकाश कुंभार यांनी दिले होते, झोनल ( पुर्व राष्ट्रीय) व राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी या ११ पॅरा नेमबाजांच्या संघाला घेऊन पॅरा टार्गेट असोसिएशन पुणेचे अध्यक्ष रफीक खान व प्रशिक्षक आकाश कुंभार हे ए एम यू शुटिंग रेंज आर्मी मार्कमॅनशिप युनिट महू मध्यप्रदेश येथे गेले होते.
नरेंद्र गुप्ता यांनी झोनल (पुर्व राष्ट्रीय) स्पर्धेत एच एस 2 १० मीटर एअर रायफल स्टॅडिंग प्रकारात ३६५ गुणांची कमाई करत कास्य पदक पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेत संतोष गाढे, अजय पलांडे, नरेंद्र गुप्ता, सचिन पडवळ, राघव बारावकर आकाश कुंभार या सहा पॅरा नेमबाजांची भारतीय संघाच्या निवड पात्रता फेरीसाठी निवड झाली आहे.
पुण्यातून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे व हे शक्य झाले आहे. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार उपायुक्त संतोष वारूळे, रंजना गगे समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, भावना मोहोळ पॅरा राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक आकाश कुंभार व रफीक खान यांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले. महाराष्ट्राला पॅरा नेमबाजी च्या झोनल ( पुर्व राष्ट्रीय) स्पर्धेत एक कांस्य पदक तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण व चार रजत पदक एक कांस्य पदक व एक संघ रजत पदक असे एकूण सात पदकं मिळाले.
यावेळी मध्यप्रदेशच्या क्रिडा मंत्री यशोंधरा राजे सिंधीया व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जयप्रकाश नोटीयाल यांनी पुणे टीमचे खास अभिनंदन केले.