क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद:-मद्यधुंद पोलिसाचा वयोवृद्ध माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला.

प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मद्यधुंद पोलिसाचा वयोवृद्ध माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला.

भारतीय सैनिक हा देशसेवेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही देशासाठी व मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान देण्यास तत्पर असतो. परंतु हल्ली समाजातील काही समाजकंटक व्यक्तींन कडून सैनिकांना सन्मानांची वागणून न देता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होत आहे. यापैकीच एक असे औरंगाबाद शहरात घडले. भारतीय वायू सेना मध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेले तसेच सेवा निवृत्ती नंतर महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करून सेवानिवृत्त झालेले वयोवृद्ध श्री. दामोदर पवार वय ६२ हे सावंगी या ठिकाणी सायंकाळी नातेवाईकांच्या लग्न समारंभ निमित्त गेले होते. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेले लक्ष्मीकांत किसनराव बनसोडे HC/ 934 (नेमणूक पोलीस मुख्यालय औरंगाबाद शहर) यांनी काही एक न बोलता पवार यांना बेदम मारहाण सुरु केली. यावेळी त्यांच्या सोबत आलेले वयोवृद्ध माजी सैनिक श्री. कैलास मोरे हे सोडवण्यास सरसावले असता त्यांचे वय विचारात न घेता त्यांनाही बेदम मारहाण केली. यावेळेस इतर लोकांनी सोडवा सोडव केली व त्याला बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेबाबत आपसात चर्चा करत असताना तीन ते चार मिनिटांनी बनसोडे परत आले व सर्व गफलत मध्ये असताना पाठीमागून अचानक डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला व दामोदर पवार जागेवरच बेशुद्ध झाले व लगेचच त्यांना सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी ऍडमिट केले.

सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन फुलंब्री येथे गुन्हा दाखल असून अद्याप त्याला पुढील कारवाई झालेली नाही. या घटनेमुळे पवार यांचे मनोबल पूर्णपणे खचलेले आहे. यासंदर्भात सैनिक फेडेरेशन अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, कार्याध्यक्ष श्री. नारायण अंकुशे, श्री निंबाळकर यांनी पवार यांचे मनोबल वाढविले व त्यांच्या मार्गदर्शनाने आज दि. 27/12/22 रोजी मा, श्री. निखील गुप्ता सर (पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर) व मा. DCP अपर्णा गीते मॅडम व मा. पोलीस अधीक्षक मनीष कवलिया (ग्रामीण) यांना गुन्हेगारावर कायदेशीर सक्त कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात कोणीही सैनिक कुटुंबावर व सैनिकावर जीवघेणा हल्ला करण्याची हिंमत करनार नाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच त्यांनी सक्त कार्यवाही करू असे आश्वासन दिले. यावेळी सैन्याच्या तीनही दलातील माजी सैनिक उपस्थित होते. या प्रसंगी रमेश पवार, अॅड. संतोष लोखंडे, कृष्णा बोरसे, गजानन पिंपळे, सुदाम साळुंके, काशिनाथ पवार, बाबासाहेब तिडके, केशव लहाने, सय्यद हय्यास, रफिक शेख, पुरुषोत्तम निकुंभ, पंजाबराव देशमुख, सांडू जाधव, गोविंद निकम, विकास मालोदे, अशोक सुस्ते, भरत पवार, भास्कर निकम, कैलास मोरे, नंदलाल झगरे, अनिल कुलकर्णी, सुभाष कोल्ते, लक्ष्मण पवार, बाळकृष्ण तुपे, कृष्णा नेमाने, योगेश बकले, बोलकर, बाबुराव जगदाळे, रामेश्वर गोराडे, भाऊसाहेब तळेकर, कृष्णा तायडे, मुंजाराम डवले, कपिल राऊत, दिपक फुंदे, व इतर पन्नासहून अधिक माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. सदरील घटने बाबत सर्व सैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button