कराड:-फिट है तो हिट है! बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल लाहोटी.
प्रतिनिधी संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
फिट है तो हिट है! बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल लाहोटी
कराड : दि.२७ प्रतिनिधी) “आजच्या धकाधकीच्या युगात मानवी जीवन चिंताग्रस्त बनत चालले आहे. विद्यार्थी, स्त्रिया व जबाबदार नागरिक भविष्याच्या काळजीने नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. त्यातूनच टोकाची पावले उचलणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मानसिक नैराशेचे कारण साखर आहे. देशातले 80% दवाखाने हे साखरेमुळे सुरू आहेत. साखर प्रचंड धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही सुदृढ राहणार का ? हा चिंतेचा विषय आहे. आज सर्व साधन सामग्री उपलब्ध आहे. आता जगायचे कसे ? हे ठरवा! कारण हिट है तो फिट है!” असे विचार बालरोगतज्ञ डॉ. अनिल लाहोटी यांनी वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडले.
डॉ. अनिल लाहोटी पुढे म्हणाले की, “आधुनिक काळात घराघरात पोहोचलेला मोबाईल हा जादू आहे. पण जीवन उद्ध्वस्त करणारे यंत्रसुद्धा आहे. चांगले आयुष्य जगण्यासाठी आचार, विचार, विकार, आहार व विहार उत्तमरित्या असणे काळाची गरज आहे. शरीर व मन ही अत्यंत गुंतागुंतीची प्रणाली आहे.”
तासवडे गावचे प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण राजाराम जाधव यांनी अध्यक्षपद भूषवले. कार्यक्रमआधिकारी प्रा. के. एस. महाले यांनी प्रमुख पाहुणे व श्री सुरेश सादिगले माजी कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण यांचा सत्कार केला. प्रा यु एस. मस्कर, प्रा एस .बी. राठोड, प्रा. पी. एस. सादिगले, सचिन ढमाले, भीमराव खरात, विकास जाधव, पांडुरंग शिंदे, रमेश जाधव, ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इम्रान मुल्ला याने प्रास्ताविक केले. अनिरुद्ध शेजवळ यांने पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनोज गायकवाड यांने आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आकांक्षा पाटील हिने केले.