सिल्लोड:-न्युज जी ९ महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा नऊ वा वर्धापण दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर:9834313401

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर
न्युज जी ९ महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा नऊ वा वर्धापण दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
सिल्लोड प्रतिनिधि
नाशिक येथे न्युज जी ९ महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचा नऊ वा वर्धापण दिन सोहळा २२ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या वर्धापण दिन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार डॉ. भारतीताई पवार
हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ. देवयानी फरांदे हे व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सय्यद, न्यूज जी ९ महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मुख्यसंपादक शाहीद मुलतानी , तसेच न्युज जी ९ महाराष्ट्र चे प्रतिनिधी महाराष्ट्र भरातुन मोठ्या संख्यने उपस्थित होते . या वर्धापण दिन सोहळ्यामध्ये जी ९ च्या प्रतिनिधींना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . औरंगाबाद जिल्ह्यातील शेख नदीम सिल्लोड व रहीम पठाण सोयगाव शामका प्रदीप चव्हाण सोयगाव मुस्तफा खान पठाण भोकरदन जालना यांना उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार न्यूज जी नाईन महाराष्ट्र संपादक शाहिद मुलतानी यांच्या हस्ते देण्यात आले आणि
यांना सम्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त सोयगाव तालुक्यातील प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण सावळदबारा सर्कलमधील सामाजिक कार्यकर्ते तालीब भैया यांना श्रीफल व शाल देऊन मान सन्मान देण्यात आला़ जळगाव जिल्ह्यातील उमेश इंगळे, ईश्वर वाणी, जिल्हा प्रतिनिधी यांना सर्वोकृष्ट महात्मा फुले या पुरस्कारांने गौरविण्यात आले . अनेक मान्यवरांनी यावेळी आपल्या मनोगतात आपले कार्य व पत्रकारीता याबद्दल अनुभव व्यक्त केले.