ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-(खटाव)- अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे स्थापन करण्याचा निर्णय अन्यायकारक–माण–खटावच्या जनतेवर अन्याय! – डॉ.विकास देशमुख
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे स्थापन करण्याचा निर्णय अन्यायकारक–माण–खटावच्या जनतेवर अन्याय! – डॉ.विकास देशमुख
मायणी
फलटण, माण व खटाव या तीन तालुक्यांसाठी प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे स्थापन करण्याचा निर्णय हा सर्वसामान्य जनतेसाठी अन्यायकारक आहे,असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.विकास देशमुख यांनी दैनिक तरुण भारत जवळ व्यक्त केले. ते म्हणाले,
फलटण हे ठिकाण तीनही तालुक्यांच्या मध्यवर्ती भागात नसून पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांना शासकीय कामांसाठी अनावश्यक प्रवास करावा लागणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या वडूज किंवा दहिवडी ही ठिकाणे अधिक योग्य व सर्वांना सोयीची आहेत.
या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा आणि जनहिताचा विचार करून मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय स्थापन करावे असे त्यांनी सांगितले.
–




