आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विटा:-हिंदी भाषेतून रोजगाराच्या विविध संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. प्रा. राजेंद्र मोहिते.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

हिंदी भाषेतून रोजगाराच्या विविध संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. प्रा. राजेंद्र मोहिते.

मायणी प्रतिनिधी
भारत हा असा एकमेव देश आहे की जिथे हजारो भाषा बोलल्या जातात तसेच प्रत्येक भाषेत सुद्धा वेगवेगळ्या बोली आणि प्रकार असलेले आढळून येतात. इतकी समृद्ध विविधता असूनही भारतात एकता नांदताना दिसून येते. भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय. हिंदी भाषेतूनच रोजगाराच्या विविध संधी आज उपलब्ध आहेत याच हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता हिंदी भाषेतलं सौंदर्य त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी १४ सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आदर्श उच्च माध्यमिक विद्यामंदिर विट्याचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र मोहिते यांनी केले. विटा येथील आदर्श पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई) मध्ये हिंदी दिवस अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदर्श पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई) चे प्राचार्य डॉ. राजेश ओहोळ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख मीनाक्षी पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व हम होंगे कामयाब हे प्रेरणागीताचे समूह गायन केले. या दिनाचे औचित्य साधून भित्तिपत्रकाचे ही प्रदर्शन प्रशालेत भरवण्यात आले. तसेच इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांनी पाणी हेच जीवन हा संदेश देणारी मूक नाटिका व इयत्ता ४थी च्या विद्यार्थिनींनी हिंदी भाषेचा गौरव करणाऱ्या गीतावर सुंदर असे नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. कु.अभय कांबळे कु.वैष्णवी मदने,सहा. शिक्षिका स्वाती भिंगारदिवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारी संचालक मा. पी. टी. पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी या कार्यक्रमाला उपप्राचार्य संतोष मेनन, सांस्कृतिक विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे, सहाय्यक शिक्षक किरण माने, राजेंद्र केंगार, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अमृता पवार, कु. व्रणाली लेंगरे यांनी केले. आभार सहायक शिक्षिका प्रमिला पवार यांनी मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button