पुणे:-(आंबेगाव)-दुरुस्तीला आलेली चारचाकी वाहने परस्पर विक्रि करून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दुरुस्तीला आलेली चारचाकी वाहने परस्पर विक्रि करून फसवणूक करणारा आरोपी जेरबंद.
५२ लाख रु. कि. ची ०७ चारचाकी वाहने हरतगत आंबेगाव पोलीस ठाणेची उत्कृष्ठ कामगिरी
दिनांक ०६/०८/२०२५ रोजी आंबेगाव पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली कि, त्यांची इनोव्हा क्रिस्ट्रा गाडी सर्विस व डेटींग, पेटींग चे काम निघाल्याने ती दुरुस्ती करीता सदर गुन्ह्यातील आरोपी फिटर भुषण उत्तम काळे, वय ३५ वर्षे, रा. घर नं. ७, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, पुणे याचेकडे दिली असता, त्याने परस्पर इनोव्हा कार जुनोनी, ता. सांगोला जि. सोलापूर येथील एजंट समीर मुबारक अत्तार याचे मध्यस्थीने त्यास कमिशन देवून कवठेमहांकाळ जि. सांगली येथील एजंट नामे आरीफ आमीन मुजावर यास उसनवार पैशाची नोटरी करून गाडी परस्पर ८,००,०००/- रुपयास विक्रि केली. त्याबाचत आंबेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. १८३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१६, ३१८, ३४०, ३(५) अन्वये दाखल केला आहे.
नमुद गुन्ह्यातील आरोपी भुषण उत्तम काळे यास दिनांक २१/०८/२०२५ रोजी रात्री. २२/०० वा. अटक करून मा. कोर्टात पाठवून त्याची दिनांक २६/०८/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली होती. तपासात त्याचेकडून १) इनोव्हा क्रिस्टा एम.एच. १४ एच के. ४२५१, २) मारुती कंपनीची वॅगनर एम. एच.१४ बी.ई. ७७०७, ३) हुंदाई कंपनीची आय १० गाडी नं. एम.एच. १९ ए.पी. ०४१०, ४) टोयोटा कंपनीची इंटॉस लिवा एम.एच. १२ एच.व्हि. ४०७९, ५) वॅगनर मारूती एम.एच १४ बी.एक्स. १६९८, ६) मर्सिडीज एम.एच. ०२ सी.डब्लू. ०००५, ७) स्विफ्ट डिझायर एम.एच. १२ एच. झेड. ७७४६ अशा ५२,००,०००/- रुपये किंमतीच्या चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास मा. श्री. अमितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा. श्री. मिलींद मोहिते, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले यांचे सुचनेप्रमाणे तपासी अधिकारी श्री. सुरेश शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, श्री. रविंद्र चिप्पा, पोलीस हवालदार, श्री. आकाश फासगे, पोलीस हवालदार, श्री. राहूल लवटे, पोलीस अंमलदार, श्री. सुभाष मोरे, पोलीस अंमलदार यांनी केला.